गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. तरुणांपासून महताऱ्यांपर्यंत अनेक गौतमीचे चाहते आहेत. गौतमीचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहे. त्याचबरोबर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात धिंगाणा करतात. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि तरुणांचा गोंधळ हे समीकरण काही आपल्यासाठी नवीन नाही. गौतमीच्या कार्यक्रमात सतत गोंधळ होतच असतो. त्यामुळे गौतमी सतत चर्चेत असते.
ब्रेकिंग! पृथ्वी शॉ वर गुन्हा दाखल, पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
राजकीय कार्यक्रम, शॉपचे उद्घाटन, किंवा बर्थ डे असो अशा अनेक कार्यक्रमांना गौतमी पाटील उपस्थित राहते. दरम्यान गौतमीचा असाच एक कार्यक्रम पंढरपूरच्या वेळापूर ठिकाणी होता. यांनतर गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू होण्याआधीच आणि सुरु झाल्यानंतर लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं जात होतं. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्वजण जागेवर शांत बसले.
आदित्य ठाकरे यांनी भरसभेत केली एकनाथ शिंदेंची नक्कल!
मात्र गौतमी तिच्या कलाकारांसह स्टेजवर येताच लोकांनी गोंधळ करायला सुरवात केली. यांनतर गौतमीने गाण्याचा ठेका धरताच सर्वजण उभा राहून नाचायला लागले. लोक काही ऐकायला तयार नव्हते त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. त्यांनतर माईकवरून आव्हान करण्यात आले की, “सर्वांना विनंती आहे. गडबड करू नका. फोटो बघून गुन्हे दाखल होतील.” असं सांगून देखील कोणी ऐकायला तयार नव्हतं प्रेक्षकांची हुल्लडबाजी सुरूच होती.
बुलेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Royal Enfield Bullet 350 लवकरच होणार लाँच