अयोध्या दौऱ्यावरून अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले, “मला देखील जायचं आहे पण…”

Ajit Pawar's visit to Eknath Shinde on Ayodhya tour; Said, "I want to go too but..."

मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आयोध्या दौरा चर्चेत आहे. शिवसेनेतील आमदार व खासदारांसह मुख्यमंत्री हा दौरा करणार आहेत. ९ एप्रिलला एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शरद पवार यांना मोठा धक्का! अतिशय जवळच्या विश्वासू सहकाऱ्यावर गुन्हा दाखल

या आयोध्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री शरयू नदीच्या काठी काही धार्मिक विधींमध्ये सहभाग घेणार आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) पहिल्यांदाच अयोध्येला ( Aayodhya) जाणार आहेत. याआधी ते राजकीय बंडखोरी करण्याआधी आदित्य ठाकरे यांच्या सोबत आयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यावरच अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय! CNG आणि PNG गॅसच्या किंमतींमध्ये ‘इतक्या’ रुपयांनी कपात होणार…

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “मला कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्याचबरोबर गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत सर्व ठिकाणी जायचं आहे. मात्र माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या लोकांची गर्दी इतकी जास्त असते की मला ते शक्य होत नाही. असं म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

धक्कादायक घटना! सज्जनगडावर जात असताना कार खोल दरीत कोसळली

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *