गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. तरुणांपासून महताऱ्यांपर्यंत अनेक गौतमीचे चाहते आहेत. गौतमीचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहे. त्याचबरोबर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात धिंगाणा करतात. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि तरुणांचा गोंधळ हे समीकरण काही आपल्यासाठी नवीन नाही. गौतमीच्या कार्यक्रमात सतत गोंधळ होतच असतो. त्यामुळे गौतमी सतत चर्चेत असते.
मोठी बातमी! पुण्यामध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची ‘ही’ तीन नावं आली समोर
राजकीय कार्यक्रम, यात्रा उत्सव, शॉपचे उद्घाटन, किंवा बर्थ डे असो अशा अनेक कार्यक्रमांना गौतमी पाटील उपस्थित राहते. दरम्यान गौतमी पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अन्नापूर या ठिकाणी कार्यक्रमासाठी आली होती. मात्र गौतमीच्या कार्यक्रमाला तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. हाणामारी देखील मोठ्या प्रमाणात होते. यामुळे गौतमीच्या कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली यामुळे गौतमीचा कार्यक्रम गौतमी येऊन देखील रद्द झाला.
दिल्लीत अग्नितांडव! प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग
मात्र गौतमी पाटीलच्या ऐवजी तिची सहकारी हिंदवी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यासाठी पोलिसांनी परवानगी देखील दिली. त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्यांच्या पदरी निराशा आल्याचे पाहायला मिळाले.
सर्वात मोठी बातमी! सात आमदारांसह अजित पवार नॉट रिचेबल? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण