मुंबई : विधानसभा अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार हल्लाबोल होताना दिसतोय. विरोधी पक्षातील आमदार वेगवेगळ्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करत मागण्या करत आहेत. पण, याचवेळी सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार संतापलेलले दिसतायेत. यायाधी देखील अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते काही मंत्री उपस्थित नाहीत पण त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले होते ते नसले तरी मी आहे. पण आता मुख्यमंत्री आणि काही मंत्रीही नसल्याने अजित पवार चांगलेच संतपाले आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “पुरवणी मागण्यांवर चर्चा चालू असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते. ते म्हटले मी स्वतः आहे. त्यामुळे बाकीचे मंत्री नव्हते तरी आम्ही ऐकून घेतलं. आता शालेय शिक्षणमंत्री सभागृहात नाही.” यानंतर शिक्षणमंत्री असल्याचं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं. यावर पवारांनी ते आत्ता आल्याचं नमूद केलं. तसेच ग्रामविकासमंत्री आणि आदिवासी विकासमंत्री देखील नाहीत, असं नमूद केलय.
यावर मंत्री शंभुराजे देसाईंनी (Shambhuraje Desai) आदिवासी विकासमंत्री आता होते, असे म्हंटले. यावर अजित पवारांनी संतापून “अरे आत्ता होते काय, तिथं बसायला पाहिजे,” अशी एकदम खड्या आवाजामध्ये प्रतिक्रिया दिली. काय शंभुराजे, तुम्ही नवीनच असल्यासारखं करत आहात, असे म्हणत अजित पवारांनी शंभूराजेंना जोरदार टोला लगावलाय.