
नाशिक मधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे बिबट्याच्या हल्ल्यामुळे सात वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्याची ही चौथी घटना. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता भाऊसाहेब सकाळे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
धक्कादायक! भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी
घटना घडली अशी की, ७ वर्षीय चिमुकली आपल्या बहिणी सोबत पाचच्या सुमारास पिंपळद गावातून दळण्याचा डबा घेऊन घरी निघाली होती. घराजवळच्याच थोड्या अंतरावर उसाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. यावेळी तेथील ग्रामस्थांनी बिबट्याची झडप बघताच त्या दिशेने पळाले. मात्र तोपर्यंत बिबट्या उसाच्या शेतात पळून गेला होता. या हल्ल्यात त्या चिमुकलीच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या. तिथे जमलेल्या गावकऱ्यांनी तात्काळ अंकिताला त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र ती मृत्यू पावली होती, अशी माहिती तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
पुणे लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
बिबट्याच्या हल्ल्यात त्या चिमुकलीच्या मान, कपाळ, डाव्या हातावर, पोट आणि बेंबीजवळ बिबट्याच्या दात आणि नखांच्या खुणा आढळून आल्या. या हल्ल्यात त्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने सकाळे परिवारावर खूप मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतेय . बिबट्याच्या हल्ल्याची ही चौथी घटना आहे. यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ब्रेकिंग! नॉट रिचेबल अजित पवार पोहचले थेट पुण्यात; 17 तास नेमके कुठं होते?