राणी मुखर्जी (Rani Mukherjee) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. व तसेच बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. राजा की आयेगी बरात या चित्रपटामधून राणी मुखर्जीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अलीकडील काळात ही अभिनेत्री खुपच कमी चित्रपटा मध्ये दिसत आहे.
या चार पाच पोरींना खोऱ्याने पैसा मिळतोय, जेष्ठ तमाशा कलावंताची गौतमी पाटीलवार जोरदार टीका
2014 सली राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. आदित्य चोप्रा, राणी मुखर्जी आणि त्यांची एक लहान मुलगी असं त्यांचं छोटंसंच कुटुंब आहे. लग्नानंतर कुटुंबाला वेळ देण्यासाठी राणीने चित्रपटसृष्टीमध्ये काही काळ ब्रेक घेतला होता. व काही काळानंतर चित्रपटसृष्टीमध्ये पुन्हा तिने काम सुरू केले. आता नुकताच मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटामध्ये राणीचं खूपच कौतुक करण्यात येत आहे परंतु तिने नवऱ्याबद्दल एक वेगळाच खुलासा केला आहे.
सर्वात मोठी बातमी! राज्यात अवकाळी-गारपिटीचा तडाखा, नद्या दुथडी भरून वाहिल्या
BFFs With Vogue या चॅट शोमध्ये नेहा धुपिया आणि राणी मुखर्जींनी आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी खुलासे केले. यावेळी राणी मुखर्जी म्हणाली की मी माझ्या नवऱ्याला शिव्या देते, त्याच्याशी रागात बोलते. त्यावर नेहाने प्रश्न विचारला की, का तू शिव्या देतेस? यावर राणीने हसत हसत उत्तर दिले की तो इतका गोड वागतो की, प्रेमात मी त्याला शिव्या द्यायला लागते. आमच्या कुटुुंबात आम्ही प्रेमाने शिव्या देतो. मी कुणाला शिव्या देत असेल, रागवत असेल तर मी त्या व्यक्तीवर प्रेम करते. यावेळी तिने तिच्या नवऱ्याच खूप कौतुक केलं. तो दिग्दर्शक म्हणून देखील उत्कृष्ट आहे. असं राणीने नेहाला उत्तर दिल आहे.