
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) हे कायम नवनवीन उपक्रम राबवत असतात. नुकताच त्यांनी महाराष्ट्रातील युवकांसाठी ‘महाव्हिजन फोरम’ नावाचा उपक्रम सुरू केला आहे. सोशल मीडियावर तर ते कायम ऍक्टिव्ह असतात. आज तर त्यांनी ट्विटरवर एक नवीन ट्रेंड (Twitter Trend) सुरू केला आहे. #AskRohitPawar हा तो ट्रेंड असून यावर ते नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत.
उष्माघात घेऊ शकतो जीव! वेळीच घ्या ‘अशी’ काळजी
विविध राजकीय विषयांपासून ते स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यावर विचारलेल्या प्रश्नांवर देखील रोहित पवार दिलखुलासपणे बोलत आहेत. या ट्रेंडमध्ये एका तरुणीने तर अतिशय अजब गजब प्रश्न रोहित पवारांना विचारला आहे. ‘माझे एका मुलासोबत प्रेमसंबंध आहेत आणि आम्ही जाणार आहोत. तुमच्या मते आम्ही काय करावे ?’ हा तो प्रश्न असून या प्रश्नावर रोहित पवारांनी दिलेले उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गौतमी लग्नबंधनात अडकणार? म्हणाली, “आयुष्यात एक तरी पुरुष…”
पळून जाण्यासाठी आई-वडिलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात त्याप्रमाणे नक्की करा. असे रोहित पवार तरुणीला म्हणाले आहेत. तसेच जर तुमचा बायोपिक करायचे ठरले, तर तुमच्या व्यक्तीरेखेसाठी तुम्ही कोणाला निवडाल ? वैभव तत्ववादी की ललित प्रभाकर? यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले आहेत की, “माझा रोल मलाच करायला आवडेल.”
मंदिरात आरती सुरू होती अन् अचानक झाड कोसळलं; ७ भाविक जागीच ठार तर ३५ जण गंभीर जखमी