कोचिंग सेंटर मध्ये झाडून काढण्यापासून ते क्रिकेटच्या टीम मध्ये खेळण्यापर्यंतचा रिंकूचा प्रवास खडतर आहे. आता नुकत्याच झालेल्या आयपीएल मॅच (2023) मध्ये KKR चा हिरो ठरलेला फलंदाज पट्टू रिंकू ने रविवारी झालेल्या मॅच मध्ये अत्यंत धडाकेबाज अशी फलंदाजी करत सर्वांची मन जिंकून घेतली.
शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य, संजय राऊत एकनाथ शिंदे गटात येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
गुजरात टायटन्सच्या तोंडातील घास रिंकू ने आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून ओढून आणला होता. शेवटच्या ओव्हर मध्ये केकेआर ला 29 धावांची गरज होती परंतु रिंकू ने आपल्या धडाकेबाज फलंदाजीसह 5 चेंडूवर 30 धावा करत रिंकू ने त्याच्या टीमला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयानंतर रिंकूची संपूर्ण क्रीडा विश्वात चर्चा रंगली व सोशल मीडिया च्या माध्यमातून लोकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ब्रेकिंग! शरद पवार यांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द
यातच रिंकू ने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत टीम इंडिया बाबत एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेट विश्वात ज्या प्रकारची परिस्थिती आणि कामगिरी सुरू आहे, ते पाहून टीम इंडियात तुला संधी मिळेल काय? असा प्रश्न विचारताच रिंकू म्हणाला , इंडियन टीम बाबत सर्व काही चांगलं आहे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही उत्तम प्रकारे होत आहे. टीम इंडिया बरोबर खेळण्या संदर्भात मला आशा आहे.
उर्फीने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘मला भाड्यानं घर पाहिजे पण कोणीही…”
इंडियन टीम सोबत खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. परंतु मी सध्या फलंदाजीवर माझं पूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे. माझ्या टीमने फायनल चा किताब जिंकावा ही माझी इच्छा आहे. या प्रवासात ज्यांनी सहकार्य केलं, त्यापैकी कोणाला क्रेडिट देशील? या प्रश्नाचे उत्तर देताना रिंकू म्हटला, भरपूर माणसं आहेत, ज्यांनी सहकार्य केलं आहे. मला माझा भाऊ, कुटुंबातील इतर सदस्य आणि माझे परीक्षक मसूद अमिने स्वप्निल सर यांनी मला खूप मदत केली.
मारुतीची ‘ही’ हॅचबॅक कार ठरतीये लोकांची विशेष पसंती; जाणून घ्या काय आहेत फिचर्स