राज्यात सध्या शेतातील कामांना चांगलाच वेग आला आहे. अवकाळी पावसाची चाहूल लागताच शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील ( Rabbi Season) पिके काढण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र उन्हाचा जोरदार तडाखा बसत असल्याने शेतातील कामासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. दरम्यान गहू काढणीसाठी एका शेतकऱ्याने केलेल्या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर ( Viral Video) चांगलाच व्हायरल होत आहे.
मोठी बातमी! विनोद तावडे यांच्या आईचे निधन
गहू ( Wheat) काढण्यासाठी मशीन असते परंतु, त्याला जास्तीचा खर्च येतो त्यामुळे शेतकऱ्याने डोक्याचा वापर करून ही शक्कल लढवली आहे. या शेतकऱ्याने स्वतःच एक मशीन बनवली असून त्या मशीनने गहू काढतानाचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गहू काढण्यासाठी आगळी वेगळी मशीन बनवनाऱ्या या शेतकऱ्यांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ @TansuYegen या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे शेतकरी पारंपारिक शेती करत असून तो जुगाड केलेल्या यंत्राने गहू कापत आहे. या यंत्रामुळे अगदी कमी वेळात जास्त गहू कापला जात असल्याचे दिसून येत आहे. हे यंत्र अतिशय सहजपणे मजुरांचे काम करत आहे.
रिंकू सिंगने टीम इंडिया बाबत दिली मोठी प्रतिक्रिया!
सोशल मीडियावर व्हायरल झालेले यंत्र पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील शेतकरी जात आहेत. हे यंत्र शेतकरी सहजपणे वापरू शकतात. कमी खर्चात व कमी वेळेत गहू काढून देणारे यंत्र हेच या यंत्राचे वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत एक मिलियन लोकांनी यंत्राचा व्हिडीओ पाहिला असून यावर अनेक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
Between tradition and modernity.
— Tansu YEĞEN (@TansuYegen) June 15, 2022
Harvest wheat.😃😃😃 pic.twitter.com/gbv0oaFLyf
ब्रेकिंग! शरद पवार यांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द