नवीन ठिकाणांना भेटी देणे, मोठा प्रवास करणे हे अनेकांना आवडत असते. प्रवासाला जाताना लोक सामान्यतः उत्सुक वैगरे असतात. मात्र काही लोकांना प्रवास म्हंटल की त्रास आठवून अंगावर काटा येतो. या लोकांना प्रवासादरम्यान ( Journey) उलटी किंवा मळमळ होण्याची समस्या उदभवते. याचाच परिणाम म्हणून त्यांना प्रवासात प्रचंड अस्वस्थता जाणवते. याच कारणाने हे लोक प्रवास टाळतात.
मोठी बातमी! विनोद तावडे यांच्या आईचे निधन
वैद्यकीय भाषेत प्रवास करताना उलटी किंवा मळमळ होण्याच्या समस्येला मोशन सिकनेस ( Motion Sickness) असे म्हणतात. मोशन सिकनेस असल्यास कार, बस, विमान किंवा ट्रक अगदी कुठल्याही वाहनाने गेले तरी लोकांना त्रास होतो. त्यांच्या उलट्या कसल्याच थांबत नाहीत. अशा लोकंसाठी आम्ही आज काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे त्यांचा प्रवास सुखदायी होईल.
प्रवासात मळमळ किंवा उलटी ( Vomating) होऊ नये म्हणून पाळा या गोष्टी!
1) अन्न योग्य पद्धतीने खावे – जेवण झाल्यानंतर लगेच गाडीमधून प्रवास करू नये. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आराम करून प्रवास करावा. तसेच प्रवास करायचा असल्यास अतिशय हलके अन्न खावे.
2) ‘हे’ अन्न खाऊ नये – प्रवासात उलटी किंवा मळमळ होऊ नये म्हणून काही अन्नपदार्थ खाणे टाळावे. यामध्ये तळलेल्या, भाजलेल्या व मसालेदार पदार्थांचा समावेश होतो.
3) जास्त पाणी प्या – प्रवासात उलट्या होऊ नयेत यासाठी भरपूर पाणी प्या. पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते. यामुळे उलट्यांचा धोका कमी होतो.
4) ही औषधे घ्या – प्रवास सुरु करण्यापूर्वी तुम्ही vomikind किंवा odem md4 या गोळ्या घेऊ शकता. यामुळे उलट्या होत नाहीत.
5) योग्य जागा निवडा – प्रवास करताना योग्य जागा निवडा. विशेषतः खिडकीजवळ बसा. तसेच कार किंवा बस मध्ये फार मागे न बसता पुढच्या सीटवर बसा.