
नुकताच उन्हाळा (Summer) सुरू झाला आहे. अशातच तापमान देखील चांगलेच वाढत आहे. या दिवसांत बहुतेक लोकांना उष्णता वाढल्याने उष्माघाताचा ( Heat Stroak) त्रास होतो. उष्माघात इतका धोकादायक असतो की, मृत्यु देखील होण्याची शक्यता असते. दरम्यान उष्माघातामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरे अचानक शरद पवारांच्या भेटीला रवाना; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव(Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात वरसाडे तांडामध्ये शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप आघाडीबाबत शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले….
प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण असं मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. घटना घडली अशी की, प्रेमसिंग चव्हाण नेहमीप्रमाणेच शेतामध्ये काम करत होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. त्यांनतर त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.