सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. राजकारणात अनेक ट्विस्ट आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या राजकीय वर्तुळात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका ट्विटन खळबळ उडाली आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत लिहिले की, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच बघू…..” सध्या त्यांचे हे ट्विट खूप चर्चेत आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असतानाच आज अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीचं कारण देखील समोर आलं आहे.
मोठी बातमी! अजित पवार भाजपात जाणार? ‘त्या’ ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मागच्या काही दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट होणार आहे. यामुळे सगळ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.
मानसिक तणावातून विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्ये आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहिले की…