पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणूकाचा थरार नुकताच संपला आहे. अगामी लोकसभा निवडणुका 2024 च्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व होते. त्यामुळे ही निवडणूक कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर व भाजपचे हेमंत रासने यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
कीर्तनकार महाराजांनी ‘त्या’ गरम तव्यावर बसणाऱ्या बाबाची प्रात्यक्षिक करत पोलखोल केली!
यावर आता एक भारी गाणे आले असून या गाण्याची चर्चा कसबा मतदारसंघासह संपूर्ण पुण्यात सुरू आहे. मुळात या निवडणुकीचा प्रचारच अटीतटीचा झाला होता. रवींद्र धंगेकर यांना पराभूत करण्यासाठी भाजपने पूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. प्रचारादरम्यान रवींद्र धंगेकर यांच्यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी ‘who is dhangekr?’ ( धंगेकर कोण आहेत ?) अशा शब्दात टीका केली होती.
ब्रेकिंग! प्रसिद्ध कोरियन अभिनेत्रीचा मृत्यू; वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
या पार्श्वभूमीवर हे गाणे तयार केले गेले असून यामध्ये धंगेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘एकजुटीन… साऱ्यांच्या मतानं… कसा उधळून लावलाय डाव…अगं चंपाबाई धंगेकराला थोडा जीव तरी लावं’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे प्रदीप कांबळे यांनी गायले असून याचे गीत उमेश गवळी व प्रदीप कांबळे यांनी लिहिले आहे.
अजित पवार खरंच भाजपासोबत जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पाऊस पडेल…”