मागच्या काही दिवसापूर्वी इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी एका कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये गौतमीवर टीका केली होती. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतोय. मात्र, गौतमी हिने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, चेंगराचेंगरी होते. आम्हाला मात्र टाळ वाजवून देखील काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिले जात नसल्याचं इंदुरीकर महाराज म्हणाले होते.
“…तर आमदार, खासदारांना मारा”; प्रकाश आंबेडकर यांच खळबळजनक वक्तव्य
इंदुरीकर महाराज यांच्या या वक्तव्यांनंतर त्यांच्यावर काही कलाकारांनी तसेच सामान्य लोकांनी देखील जोरदार टीका केली. दरम्यान यामध्येच आता ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे (Senior writer Sadanand More) यांनी इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील (Gautami Patil) या दोघांवर देखील जोरदार टीका केली आहे.
पंजाब हरियाणा मधून आणलेल्या गाईचा उन्हाळ्यामुळे होतोय मृत्यू
नेमकं काय म्हणाले सदानंद मोरे?
सदानंद मोरे म्हणाले, गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज या दोघांनाही आपापल्या क्षेत्रातील लोकं नावं ठेवत आहेत. गौतमीने लावणीची संस्कृती बिघडवली आणि वारकरी सांप्रदायातील लोक देखील इंदुरीकर महाराजांना नावं ठेवतात. त्यामुळे दोघांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशी जोरदार टीका सदानंद मोरे यांनी केली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
‘ही’ आहे रोहित पवार यांची आवडती अभिनेत्री; रोहित पवारांच्या ‘त्या’ उत्तराची सर्वत्र चर्चा!