कडक उन्हाळ्याचे दिवस असताना देखील राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांचे व पिकांचे नुकसान झालेले दिसून येत आहे. गेल्या आठ दहा दिवसापासून पावसाचा वेग हा जास्त प्रमाणात वाढला आहे. आणि अशा वातावरणातच हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
गारपिटीमुळे द्राक्ष उकिरडयावर फेकण्याची वेळ; शेतकरी हतबल
कोकण आणि मध्य महाराष्ट्राला १६ एप्रिल पर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडासह गारपिटीचा देखील मारा होईल असा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे येत असल्यामुळे पाऊस हा वाढला आहे. गेल्या आठ-दहा दिवसामध्ये द्राक्ष,आंबे, संत्रा, केळी या फळबागांचे व गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
राजकीय घडामोडींचा वेग! पवारांसोबतच्या भेटीनंतर राहुल गांधी उद्धव ठाकरेंची भेट घेणार
नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न घेतले जाते. परंतु पावसाने मोठ्या प्रमाणावर कांद्याची नासाडी केली आहे. काढणी केलेला कांदा हा जाग्यावरचसडत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये हळद उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.