
राज्यात COVID-19 ने पुन्हा एकदा परत येण्याची चाहूल दिली आहे. गोंदिया जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. कोरोनाची ही चौथी लाट उसळली आहे. कोरोना बाधितांची संख्याही प्रचंड वाढली आहे. त्यातच या चौथ्या लाटेमुळे एक जणाचा मृत्यू देखील झालेला आहे. मात्र जिल्ह्यामध्ये लस उपलब्ध नाही, त्यामुळे चिंता वाढलेली आहे. मागणी करूनही लस मिळत नाहीत. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
रितेश देशमुखने केला पहिल्या प्रेमाचा खुलासा; म्हणाला, “ते माझं प्रेम अपूर्ण…”
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेने शिरकाव केला असून, जिल्ह्यात सध्या २८ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, तर एकाचा मृत्यू झालेला आहे. धोका प्रचंड वाढतोय मात्र या परिस्थितीत देखील कोरोनाची लस उपलब्ध नाही. मागणी करूनदेखील लस पुरवठा झालेला नाही. त्यामुळे स्वतः नियमांचे पालन करत काळजी घेणे महत्त्वाचे व गरजेचे आहे.
सावधान! ऑनलाइन गेमिंगच्या नादात तरुणाने गमावले तब्बल ४० लाख रुपये, जमीनही विकली
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्याभरात १,११५ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आता ५,४२१ एवढी झाली आहे. कोरोनाने ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मोठी बातमी! भीमा पाटस कारखान्याप्रकरणी संजय राऊतांची दौंडमध्ये 26 एप्रिलला सभा