प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट (sairat movie) हा चित्रपट प्रदर्शित होऊन ६ वर्ष उलटली आहे. हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला होता की या चित्रपटाची चर्चा सगळ्यांच्याच तोंडात होती. विशेष म्हणजे अजूनही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. सैराट या चित्रपटात अभिनेता आकाश ठोसर (Aakash Thosar) आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) यांच्यासोबतच लंगड्या आणि सल्या या भूमिकाही चांगल्याच गाजल्या. दरम्यान या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात लंगड्या म्हणजेच अभिनेता तानाजी गालगुंड (Tanaji Galgund) याच तर आयुष्यच बदललं आहे.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “..तर अश्लीलता”
नेमक कस बदललं तानाजीचं आयुष्य?
तानाजी म्हणाला, “चित्रपटात काम करण्याआधी मी फक्त शेती करत होतो शेती सोडून दुसरा कोणताही पर्याय माझ्याकडे नव्हता. मी शेतीसोबत महाविद्यालयीन शिक्षण देखील घेत होतो. मात्र मी शेतीच काम केलं असत तर आयुष्यभर तेच काम करत राहिलो असतो. चित्रपटांमध्ये काम करत असताना माझा अवाका वाढला. चांगली माणसं मिळाली. आता हळूहळू प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दुर्ष्टीकोन देखील बदलला आहे”.
बैलगाडा शर्यतीला गालबोट! युवकाच्या पोटात बैलानी खूपसले शिंग; तरुणाचा जागीच मृत्यू
“माझ्या पायांची मी शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. जर मी आजपर्यंत गावाकडे शेतीच करत राहिलो असतो तर कधीच माझ्या पायाची शस्त्रक्रिया करता आली नसती. आतापर्यंत मी आठ ते दहा लाख रुपये पायावर खर्च केले. हे सगळं श्रेय फक्त ‘सैराट’ चित्रपटाला आहे. असा मोठा खुलासा तानाजी गालगुंडने केला आहे.