सध्याची तरुण पिढी ही शेतीकडे वळल्याचे चित्र दिसून येत आहेत. तरुण वर्ग शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून कमी खर्चामध्ये जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान सध्या श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील युवा शेतकरी संजय रोडे यांची सगळीकडे जोरदार चर्चा होताना दिसत आहे. संजय रोडे यांनी पिवळ्या कलिंगडाची लागवड (Cultivation Watermelon) केली असून त्यामध्ये त्यांनी चांगलं उत्पन्न घेतलं आहे.
IPL 2023 : जखमी असून देखील ऋषभ पंतने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
या कलिंगडाबाबत पहिले तर हे कलिंगड दिसायला जरा वेगळं आहे. त्यामुळे या कलिंगडाला चांगला दर मिळत आहे. महत्वाचं म्हणजे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानं त्यांना यातून शाश्वत दर मिळाला आहे. संजय रोडे यांनी आपल्या दीड एकर शेतात कलिंगड लागवड केली आहे. यामध्ये आरोही, विशाला आणि सरस्वती या वाणाच्या कलिंगडाची लागवड त्यांनी केली आहे. यामधील विशाला वाणाचे कलिंगड बाहेरुन पिवळ्या रंगाचे आहे मात्र आतून ते लाला रंगाचे निघते.
‘सैराट’ फेम लंगड्याने पायासाठी खर्च केले ‘इतके’ लाख रुपये!
संजय रोडे यांनी दीड एकरात 12 हजार रोपांची लागवड केली आहे. यासाठी त्यांना 70 ते 75 हजारांचा खर्च आला आहे. त्यांनी एका खासगी कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे कलिंगड विकण्यासाठी बाजारपेठेमध्ये जाण्याची गरज पडत नाही. बाजारभावापेक्षा जागेवरच जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे त्यांना चांगला नफा देखील मिळतोय.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “..तर अश्लीलता”