गोठ्यात नवीन जनावर आणले की त्याचे अगदी आनंदात स्वागत केले जाते. सांगली ( Sangali) जिल्ह्यातील भिलवडी येथील एका शेतकरी अक्षय मोरे यांनी सुद्धा चांगले सत्तर हजार मोजून नवीन बैल विकत घेतला. या बैलाचे स्वागत मात्र अगदी अनोख्या पद्धतीने झाले आहे. हा बैल घरी आणताच गाडीमधून उतरत असताना ट्रॅक्टरच्या हॉर्नमुळे अचानक बिथरला आणि पळू लागला. पळता पळता बैलाने थेट नदीकाठ गाठला आणि थेट नदीपात्रात पडला.
श्रीगोंदा तालुक्यातील युवा शेतकऱ्याची कमाल! केली पिवळ्या कलिंगडाची लागवड
यापुढे मात्र भयानक प्रसंग घडला आहे. बैल नदीत पडल्या पडल्या गोंधळून गेला आणि अंकलखोपच्या दिशेने पोहत जाऊ लागला. यावेळी चार पाच मगरींनी बैलाचा पाठलाग करायला सुरुवात केली. मगरींना चकवा देत बैल काठच्या दिशेने निघाला होता. मात्र चारीही मगरींनी बैलाला घेरून टाकले होते. समोरचे दृश्य पाहून बघायला आलेले लोक देखील प्रचंड घाबरले होते.
IPL 2023 : जखमी असून देखील ऋषभ पंतने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
अखेर गावातील युवकांनी तेथील नावाडी नितीन गुरव यांना घटनास्थळी बोलावले. नितीन गुरव यांनी काही तरुणांना सोबत घेऊन तराफ्याच्या सहाय्याने मगरींना बैलापासून बाजूला केले. आणि मगरींच्या जाळ्यातून बैलाची सहीसलामत सुटका केली. तब्बल चार तास हा थरार सुरू होता. संगलीमध्ये या घटनेची जोरात चर्चा सुरू आहे.
ब्रेकिंग! जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळली, ८ जण जागीच ठार