
महाराष्ट्रात कित्येक वर्षे सत्ता गाजवणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष बाहेरील राज्यांमध्येही विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे,’राष्ट्रवादी’ पक्षाने याआधीही कर्नाटकमध्ये विधानसभेकरता आपले उमेदवार मतदारसंघांमध्ये उभे केलेले होते. परंतु, ‘राष्ट्रवादी’ला एकाही जागेवर आपला विजय निश्चित करता आला नव्हता, तरी पण यावेळेस देखील कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्याची राष्ट्रवादीने तयारी दाखवली आहे. यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) राष्ट्रवादीला यश मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अभिनेत्री स्वरा भास्कर एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ पैसे; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
राज्यातील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गमावला असून कर्नाटकातील विधानसभा निवडणूक लढवणार असा निर्णय या पक्षाने घेतलेला आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या आसपासच्या राज्यांमध्ये उमेदवार उभे करत पुन्हा पक्षविस्तार करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आपले कोणते आणि किती उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उभे करणार आहेत. तथापि स्पष्ट झाले नाही. परंतु, मुंबईत (Mumbai) पार पडणाऱ्या पक्षाच्या बैठकीनंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कळविले आहे.
तर कर्नाटकात आम्ही कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही असे ही शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणताही पाठिंबा न घेता स्व:हिंमतीवर जागा लढवणार आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.
गौतमीचा कार्यक्रम सुरु झाला अन् महिलांनी केलं असं कृत्य की सर्वजण पाहतच राहिले; पाहा Video