राजकीय वर्तुळात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीने नागपूर येथे वज्रमूठ सभेचे आयोजन केले आहे. महाविकास आघाडीने पहिल्यांदाच नागपुरात सभेचे आयोजन केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सभेमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना विशेष व मोठी खुर्ची देण्यात येणार नाही. याठिकाणी सर्व नेत्यांना एकसारख्याच खुर्च्या बसण्यासाठी देण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर शरद पवारांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!
याआधी छत्रपती संभाजीनगर ( Sambhajinagar) येथे झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठी खुर्ची देण्यात आली होती. ही खुर्ची इतर नेत्यांना देण्यात आलेल्या खुर्चीपेक्षा वेगळी होती. यामुळे महाविकास आघाडी मधील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. म्हणून नागपूरच्या वज्रमूठ सभेत (Vajramuth Meeting) हा बदल करण्यात आलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, “या सभेत प्रत्येक पक्षातील दोन नेत्यांना बोलण्याची संधी मिळणार आहे. काही नेते कर्नाटकात गेले आहेत. त्यामुळे सर्वच नेते येतील असे नाही. मला सुरतला महत्त्वाचे काम होते त्यामुळे मी संभाजीनगरच्या सभेला अनुपस्थित होतो. नागपुरातील वज्रमूठ सभा जोरात होणार आहे”.