
मुंबई : कोरोना महामारीनंतर म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर आता गणेशोत्सव साजरी होणार आहेत.काही दिवसात लाडक्या गणपती बाप्पाचं जोरदार आगमन होणार आहे. सार्वजनिक गणपती मंडळांनी देखील गणेशाच्या आगमनाची मोठी तयारी केली आहे.कोरोनामुळे दोन वर्षानंतर हा उत्सव साजरा होत असल्याने तो पर्यावरणपूरक व्हावा असं आवाहन महापालिकेने केलं आहे.यंदा कुठले निर्बंध घालण्यात आलेले नाहीत.मात्र काही नियम आखून देण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने पुढील नियमावली आणि मार्गदर्शक प्रणाली जाहीर केली आहे.
VIDEO : ‘गोमी-गोमी, गोमी’ गाण्यावर थिरकली चिमुकली, व्हिडिओ पाहून पडताल प्रेमात
गणेशोत्सवासाठीचे महत्त्वाचे नियम आणि मार्गदर्शक तत्व
1) शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्तीची स्थापना करावी.
2)आरास करण्यासाठी पर्यावरणपूरक बाबींचा वापर करावा तसेच थर्माकोल, प्लास्टिक इत्यादी विघटन न होणाऱ्या वस्तू पदार्थांचा वापर टाळावा.
3)यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा नाही पण मंंडळाच्या मंडपांची उंची ही 30 फूट असायला हवी.
4)मंडप बांधलेल्या ठिकाणी रस्त्याच्या परिसरामध्ये तुम्ही खड्डा केलेल्या मंडळांना 2000 रूपयांचा दंड भरावा लागणार आहे.
5) गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावं.किंवा महापालिकेच्या गणेशमूर्ती संकलन केंद्रात मूर्ती जमा कराव्यात.
6) घरगुती आणि सार्वजनिक उत्सवस्थळी जमा होणारं निर्माल्य कलशातच संकलित कारवं.
7) प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा.
8) सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी उत्सवस्थळी ध्वनिक्षेपकांचा आवाज संयमित ठेवावा.
9)ध्वनीप्रदूषणाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं.
10)या काळात मावा, माव्यापासून तयार केलेली मिठाई आणि खाद्यपदार्थ खरेदी करताना ती शिळी आणि खवट असणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
11)सार्वजनिक मंडपाच्या परिसरात आग विझविण्यासाठी सहज उपलब्ध होईल अशारितीने वाळू (रेती) बादल्या व पाण्याची व्यवस्था असावी.
12)नैसर्गिक विसर्जनाचे ठिकाण, कूत्रिम तलावाचे ठिकाण आणि मूर्ती संकलन केंद्र या ठिकाणी उपस्थित असलेले मनपा अधिकारी/कर्मचारी यांच्याकडेच आपण आपली श्रीगणेश मूर्ती द्यावी. त्यानंतर महापालिकेतर्फे मूर्तीचं विसर्जन केलं जाईल.
विधानभवन परिसरात सत्ताधारी- विरोधकांमध्ये धक्काबुक्की, कारण..