प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांमधील एक योजना आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने केंद्र सरकारने ( Central Government) ही योजना सुरू केली आहे. आतापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर झाले असून शेतकरी 14व्या हप्त्याची वाट पाहत आहे.
खोपोलीच्या अपघाताबाबत जखमी प्रवाशांनी मुख्यमंत्र्यांना सांगितली धक्कादायक माहिती!
माहितीनुसार, लवकरच १४ हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र त्यायाधी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. जर शेतकऱ्याने अजूनही eKYC केले नसेल तर ते करा. अन्यथा पीएम किसान योजनेचा पुढील हप्त्याचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. ही ई-केवायसी ऑनलाइन पद्धतीने करावी लागणार असून यासाठी शेतकऱ्यांना घाई करावी लागणार आहे. तरच शेतकऱ्यांना फायदा होईल.
भाजप राष्ट्रवादी फोडणार? संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यावर असणाऱ्या फॉर्मर्स कॉर्नर वर ई-केवायसी साठी लिंक उपलब्ध असणार आहे. त्या लिंक वर क्लिक केल्यास ई-केवायसी करता येईल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकरी CSC किंवा वसुधा केंद्राची मदत घेऊ शकतात. याठिकाणी बायोमेट्रिक प्रक्रियेद्वारे ई-केवायसी केली जाते. ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त 15 रुपये इतके शुल्क घेतले जाते.
अजित पवार भाजपमध्ये जाणार? नाना पटोले स्पष्टच म्हणाले, “त्यांच्या मनात नेमकं…”