राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने येत्या दोन दिवस पाऊस पडणार आल्याचा अंदाज वर्तविला होता. यापार्श्वभूमीवर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या ४ तासांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा! कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मिळाले घड्याळ चिन्ह
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, धुळे आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये काही हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.
‘मविआ’च्या उद्याच्या सभेला अजित पवार गैरहजर राहणार? नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण
दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतपिकाला भाव नाही आणि दुसरीकडे अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
या विकेंडला घर बंदूक बिर्याणी पाहा अगदी स्वस्तात; चित्रपटाच्या टीमने दिलीय विशेष ऑफर