राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यापासून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर सतत टीका करत आहे. दरम्यान ही स्थिती असताना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.
या मुलखीमध्ये आदित्य ठाकरे यांनी अनेक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांना तुम्ही लग्न कधी करणार आहात? असा प्रश्न विचारण्यात आला होता. असा प्रश्न विचारतात आदित्य ठाकरे उत्तर देण्याऐवजी हसले आणि जाऊद्या, म्हणत या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.
शरद पवारांना मोठा धक्का! भुजबळांचा विश्वासू नेता शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार
त्याचबरोबर तुम्हाला लग्नासाठी मुलगी कुठली तरी हवी? मुंबईची हवी की ठाण्याची हवी? राजकारणातील हवी का? असा प्रश्न विचारण्यात आला. या सर्व प्रश्नांवर उत्तर देताना बिलकुल नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. दरम्यान, या मुलाखतीवेळी आदित्य ठाकरेंनी लग्नाबाबतच्या प्रश्नाची उत्तर देणं टाळल आहे.
पावसासंदर्भात मोठी बातमी! पुढील तीन-चार तास महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट