‘शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत’ ही एक मोठी समस्या आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये (Karnataka) जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनी महत्त्वाची घोषणा देखील केली. दरम्यान आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला आहे.
शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? ‘या’ बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट!
शेतकरी मुलासोबत लग्न करणाऱ्या मुलीच्या नावावर राज्य सरकारने 10 लाख रुपये आणि मुलीच्या वडिलांच्या नावावर 5 लाख रुपये ठेवावे. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. यासाठी लवकरच वरात मोर्चा देखील काढला जाणार आहे. ( Marriage of farmers)
शेतकरी घरातील मुलाचे गौतमी पाटीलला थेट पत्र; म्हणाला, “लग्न करा म्हणायची वेळ…”
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच लवकरात लवकर मागणी पूर्ण नाही झाली तर सांगलीच्या ( Sangali) जिल्हाधिकारी कार्यालयावर वरात मोर्चा काढला जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने त्यांची लग्ने होत नाहीत. या मुलांचे वय ४० च्या पुढे गेले तरी ती बिनलग्नाची राहतात. एवढंच नाही लग्नासाठी नोकरी करायला जावी तर बेरोजगारी मुळे नोकरीच मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी करायचं तरी काय ? असा प्रश्न उपस्थित होतोय.
Atik Ahmed Murder: पत्रकार बनून आले, गोळ्या झाडल्या, जय श्री रामाचा गजर केला अन् सरेंडरही केलं