
तरुण वर्ग तसेच महिला वर्ग यांच्यासाठी नोकरी मिळणे ही एक समस्या बनत चालली आहे. चांगलं शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नसल्याने अनेकजण बेरोजगार आहेत. मात्र आता नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिकेमध्ये जवळपास १५४ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांची मुलं राहतायत बिनलग्नाची! शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलाय पुढाकार
त्यामुळे पुण्यामध्ये नोकरी शोधत असणाऱ्यांसाठी ही एक आनंददायक बातमी आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून आशा स्वयंसेविका या पदाचा रिक्त जागा महानगरपालिकेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. यामुळे महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे.
सावधान! अयोग्य वेळी अंडी खाणे पडू शकते महागात; जाणून घ्या अंडी खाण्याची योग्य वेळ
शैक्षणिक पात्रतेबद्दल पाहिले तर यासाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान दहावी पास असावा. त्याचबरोबर या पदासाठी फक्त आणि फक्त त्यासंबंधीत कार्यक्षेत्रातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
गँगस्टर अतिक आणि त्याच्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आले समोर!
अर्ज करण्याची अंतिम तारीख –
अर्ज 25 एप्रिल 2023 पासून ते 4 मे 2023 पर्यंत करता येणार आहेत. यासाठी वयोमार्याद पाहिली तर या पदासाठी 25 वर्षांपेक्षा अधिक आणि 45 वर्षांपर्यंतचा उमेदवार अर्ज करू शकतो.
शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? ‘या’ बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट!
खाली दिलेल्या लिंकवर पाहा जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1841nrssVZvwR_cBXDdwusIwDx1tBtWiD/viewशेतकरी घरातील मुलाचे गौतमी पाटीलला थेट पत्र; म्हणाला, “लग्न करा म्हणायची वेळ…”