राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याला भाजपकडून ऑफर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) लवकरच भाजपमध्ये जातील असे म्हंटले जात आहे. काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अमोल कोल्हेंच्या भाषणाचे कौतुक केले होते.
अमोल मिटकरींच्या ट्विटने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ; ट्विट करत म्हणाले, “भाजपाकडून…”
यापार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( Narendra Modi) तुमचे कौतुक केले, मग आता तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडून ऑफर देखील आहे का? असा प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना मिश्किलपणे ते म्हणाले की, ” एखाद्या चांगल्या बातमीनंतर दुसऱ्या वृत्तपत्राच्या संपादकाने तुमचे कौतुक केले, तर तुम्ही तिकडे जाणार का?”
अजित पवारांचा निर्णय पक्का? तिथी लवकरच काढली जाईल; गुलाबराव पाटील यांचे सूचक वक्तव्य
यावर पत्रकाराने पुन्हा एकदा प्रश्न केला की पंतप्रधानांकडून कौतुक हीच ऑफर नाही का? त्यावर अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले की पंतप्रधानांनी लोकसभेत कौतुक करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मात्र ही ऑफर नाही. सध्या माझ्यासाठी शिवपुत्र संभाजी हे नाटक हीच ऑफर आहे. राजकीय पदं आणि राजकारण या गोष्टी फक्त 5 वर्षासाठी असतात मात्र शिवपुत्र संभाजी हे नाटक शास्वत आहे.
ब्रेकिंग! शरद पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “भाजपसोबत जाण्यासाठी…”