उद्योगपती आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला जुलै 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवून सशुल्क अॅप्सवर प्रसारित केल्याचा गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नंतर दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. मात्र राज कुंद्रा कधीच सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह दिसला नाही. काही कार्यक्रमांमध्ये देखील तो तुरळक प्रमाणात दिसून येतो.
राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता फुटणार? भाजपकडून आली ऑफर! थेट मोदींनीच केले कौतुक
दरम्यान, सध्या राज कुंद्रा याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राज कुंद्रा आणि त्याचा मुलगा गाडीतून बाहेर पडतात. त्यानंतर शिल्पा देखील मुलीसोबत दिसत आहे. मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये या सर्वांना पाहिलं गेलं. मात्र यावेळी राज कुंद्राचा नवीन अवतार पाहून सर्वजण चक्रावले आहेत.
अजित पवारांचा निर्णय पक्का? तिथी लवकरच काढली जाईल; गुलाबराव पाटील यांचे सूचक वक्तव्य
राज कुंद्राने यावेळी एका सुपरहिरोच्या मास्कप्रमाणे दिसणाऱ्या मास्कने आपला चेहरा झाकलेला दिसत आहे. विरलभयानी या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओवर नेटकरी देखील वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकरी कमेंट करत म्हणत आहेत की, ‘याने तर उर्फीलाही मागे टाकले’ अशा अनेक वेगेवेगळ्या कमेंट नेटकरी करत आहेत.
अमोल मिटकरींच्या ट्विटने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ; ट्विट करत म्हणाले, “भाजपाकडून…”