
अनेक तरुणांची इच्छा असते की आपन देशसेवा करण्यासाठी लष्करी विभागामध्ये काम करावे. मात्र अशी संधी सर्वांनाच भेटते असे नाही. व ज्यांना ही संधी भेटते त्यामधले काहीजण देशासाठी शहीद होतात तर काहीजण देशसेवा करुन निवृत्त होतात. दरम्यान, सध्या सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील २२ वर्षीय जवान देशासाठी शहीद झाला आहे.
‘जे भाजपामध्ये जातील तो त्यांचा वैयक्तिक निर्णय’ शरद पवार स्पष्टच बोलले
पंजाब भटिंडा कॅम्पमध्ये देश सेवा करत असताना डोक्यामध्ये गोळी लागून तेजस लहुराज मानकर शहीद झाला आहे. तेजसला उपचारासाठी लगेच मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. डॉक्टराने तपासणी केल्यानंतर तेजसला शहीद म्हणून घोषित केले. विशेष म्हणजे तेजस ज्या कॅम्पमध्ये होता, तेथे झालेल्या गोळीबारात चार जवान शहीद झालेत. तेजस शहीद होण्यापूर्वी पाच दिवस अगोदर यात्रेनिमित्ताने गावी आला होता. सुट्टीनंतर देशसेवेसाठी रुजू झाल्यानंतर पाचव्या दिवशी तेजस शहीद झाला. तेजस शहीद झाल्याची बातमी समजल्यास जावली तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागपूरच्या वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरे कडाडले! विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले…
तेजस दोन वर्षांपूर्वीच लष्करात भरती झाला होता. त्याच्ये वडील देखिल लष्करात काम करत होते. तसेच ते मेजर पदावरून निवृत्त देखील झाले होते. तेजस चा भाऊ देखील सैन्यदलामध्ये देशसेवा करत आहे. सातारच्या सैनिक धरती भूमीमध्ये अजून एक जवान शहीद झाल्यामुळे पूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक! पुण्यात भररस्त्यात चालू इलेक्ट्रिक कारने घेतला पेट