मुंबई येथे काल (ता.१६) महाराष्ट्र भूषण पुरस्कार पार पडला. जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला असून यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह ( Amit Shah) उपस्थित होते. थाटात पार पडलेल्या या सोहळ्याला एका गोष्टीमुळे गालबोट लागले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अनेक लोकांना उष्माघाताचा त्रास झाला. ( Heat Stroak) यामुळे ११ जणांचा मृत्यु झाला असून 19 जणांवर उपचार सुरू आहेत.
एक किलो बटाट्याची किंमत अर्धा तोळा सोन्यापेक्षा आहे जास्त! किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क
खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या लोकांना उष्माघाताचा त्रास झाला. यातील जवळपास १२५ लोकांनी डिहायड्रेशनची तक्रार केली. सुरुवातीला घटनास्थळी असलेल्या मेडिकल बूथ मध्ये या लोकांना उपचारासाठी न्हेले. यामधील ज्या लोकांना विशेष उपचाराची गरज होती, त्यांना कामोठे येथील एमजी एम रुग्णालयात न्हेण्यात आले.
संजय शिरसाट यांचा मोठा दावा; म्हणाले, अजित पवार अमित शाहांबरोबर…”
दरम्यान ११ लोक दगावले असून ८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या लोकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार व आदित्य ठाकरे यांनी भेट घेऊन विचारपूस केली. खरंतर या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी भरपूर लोक उपस्थित होते. येथे उपस्थित असणारे लोक भर उन्हात हा कार्यक्रम पाहत होते. त्यांच्यासाठी व्यवस्थित सोय करण्यात आली न्हवती. त्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
२२ वर्षीय साताऱ्याचा ‘वीरपुत्र’ देशासाठी शहीद; पाच दिवसांपूर्वीच गावी येऊन गेला होता…