गूगल हे सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. गुगलच्या बऱ्याच सेवा आपण वापरत असतो. गूगल क्रोम वेब ब्राऊजर ( Google Chrome) ही यातीलच एक सेवा आहे. जगभरात भरपूर लोक माहिती शोधण्यासाठी गूगल क्रोमचा वापर करतात. गूगल आपल्या सेवांमध्ये नेहमी अपडेट्स आणत असते. नुकतेच गूगलने गूगल क्रोम बाबत एक नवीन अपडेट आणले आहे.
एक किलो बटाट्याची किंमत अर्धा तोळा सोन्यापेक्षा आहे जास्त! किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क
सर्व गूगल क्रोम वापरकर्त्यांसाठी हे अपडेट महत्त्वाचे आहे. हे अपडेट न केल्यास क्रोम युजर्सना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. कारण सध्याचे क्रोम वापरणे धोकादायक आहे. गुगलला क्रोम ब्राउझरमध्ये दोन सुरक्षा दोष आढळून आले आहेत. याची कबुली स्वतः गुगलने दिली आहे. गुगलच्याच थ्रेट अॅनालिसिस या ग्रुपने हा बग ओळखला आहे. हा बग दूर करण्यासाठी गूगलने आपल्या वापरकर्त्यांना क्रोम अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संजय शिरसाट यांचा मोठा दावा; म्हणाले, अजित पवार अमित शाहांबरोबर…”
असे अपडेट करा क्रोम
- तुमच्या सिस्टमवर Chrome ब्राउझर उघडावा.
- वेब स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन डॉट वर क्लिक करा.
- त्यांनतर settings मध्ये जा.
- येथे ‘Chrome बद्दल’ वर क्लिक करताच तुम्हाला तुम्ही क्रोमचे कोणते व्हर्जन वापरत आहात ते समजेल.
- याठिकाणी तुम्ही chrome अपडेट करू शकता.
२२ वर्षीय साताऱ्याचा ‘वीरपुत्र’ देशासाठी शहीद; पाच दिवसांपूर्वीच गावी येऊन गेला होता…