यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला. काल मुंबईमधील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह ( Amit Shah) उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमात ११ लोकांचा उष्माघाताने मृत्यु झाला आहे. यामुळे या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे.
सावधान! गूगल क्रोम वापरताय तर एकदा हे वाचाच…
आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari) यांना मानणारा वर्ग फार मोठा आहे. यामुळे या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. त्यात प्रचंड कडक उन्हाळा यामुळे लोकांना उष्माघाताचा त्रास झाला. या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेविषयी माध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. तसेच आयोजकांच नक्की काय चुकलं हे देखील सांगितले आहे.
मोठी बातमी! महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यु
कार्यक्रमासाठी दुपारची वेळ निवडणे हे आयोजकांचे चुकले आहे. संध्याकाळची वेळ असती तर योग्य झाले असते. कारण संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी असते. मुळात एप्रिल-मे मध्ये अशाप्रकारचे कार्यक्रम घेऊच नयेत असा टोला अजित पवार ( Ajit pawar) यांनी लागवला आहे. तसेच आप्पासाहेब पवार यांना मानणारा वर्ग फार मोठा आहे. त्यांच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक येतात. यामुळे त्यांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी होती. असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.
एक किलो बटाट्याची किंमत अर्धा तोळा सोन्यापेक्षा आहे जास्त! किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क