राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्यावरून बरेच तर्कवितर्क लावणे सुरू आहेत. दरम्यान जेव्हापासून अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरू झाल्यात तेव्हापासून सर्वांचेच अजित पवारांच्या हालचालींवर एकदम बारीक लक्ष आहे. आज अचानक अजित पवारांनी ( Ajit Pawar) पुण्यातील एक कार्यक्रम रद्द केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मागील काही दिवसांपूर्वी देखील असेच कार्यक्रम रद्द करून अजित पवार चक्क १७ तास गायब झाले होते.
१२ वर्षांच्या मुलाची बॉडी पाहून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा Video
ज्या वेळी राजकीय वर्तुळातील नेते अचानक गायब होतात. तेव्हा तेव्हा राजकीय समीकरणे हमखास बदलतात. म्हणून अजित पवार कार्यक्रम रद्द करून अचानक गायब झाल्याने सगळीकडे गोंधळ उडाला आहे. आधीच अजित पवार नाराज असल्याच्या व ते लवकरच भाजपसोबत ( BJP) हातमिळवणी करतील अशा चर्चा सुरू आहेत. त्यात आता त्यांच्या अचानक गायब होण्याची भर पडल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजित पवार आज पुरंदर येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला जाणार होते. यासाठी आयोजकांनी त्यांचे पोस्टर वैगरे लावून जय्यत तयारी देखील केली होती. मात्र अचानक अजित पवारांनी दौरा रद्द केल्याने त्याठिकाणी सुप्रिया सुळे व शरद पवार उपस्थित राहणार आहेत.