मुंबई : कोरोना महामारीनंतर यंदाच्या दहीहंडी(Dahihandi) उत्सव दणक्यात साजरी करण्यात आला.लाखो मुंबईकर (Mumbai)सोमवारी दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. मुंबई, ठाणे नवी मुंबई येथे मनाच्या दहीहंडी फोडण्यात आल्या. यावेळी अनेक गोविंदा जखमी झाले.दरम्यान विलेपार्ले येथे दहीहंडीच्या सातव्या थरावरून पडून संदेश दळवी (sandesh dalvi)या गोविंदाचा मृत्यू (death) झाला आहे.
Supriya sule: अहो या नवीन सरकारचा हनिमून आणखी किती दिवस टिकणार, सुप्रिया सुळेंचा घणाघात
यावेळी दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदा पथकाला पुरेशी सुरक्षाव्यवस्था न दिल्याचा आरोप केला आहे. कुर्ल्यातील रहिवासी असलेला संदेश दळवी पार्ल्यातील शिवशंभो गोविंदा पथकाचा सदस्य होता.दरम्यान याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी दहीहंडी उत्सवाचा आयोजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष रियाझ शेख (३६) याला अटक केली.
ग्रामीण रस्त्यांसाठी शासनाने भरीव निधी उपल्बध करून द्यावा – आमदार राहुल कुल
रियाझ शेखवर सुरुवातीला मानवी जीवन धोक्यात आणल्याबद्दल भारतीय दंड विधान संहितेचे कलम ३३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, संदेश दळवीच्या मृत्यूनंतर ३०४ (अ) मध्ये त्याचे रूपांतर करण्यात आले. तसेच विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नार्वेकर म्हणाले, की ‘शेखने सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे दळवी यांचा मृत्यू झाला तर दुसरा गोविंदा अद्याप रुग्णालयात दाखल आहे.