“अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेलीये अन् फडणवीसच स्क्रिप्ट रायटर” ठाकरे गटाच्या महिला नेत्याचं मोठं भाष्य

"Ajitdad's script is written by BJP and Fadnavis is the script writer" Thackeray group's female leader's big comment

राजकीय वर्तुळात विविध अफवा आणि चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार अशा चर्चा काही दिवसांपासून राज्यात सुरू होत्या. मात्र खुद्द अजित पवारांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीकाँग्रेस मध्येच राहू असे अजित पवारांनी सांगितले आहे. (Ajit Pawar said that he will stay in NCP till his last breath) दरम्यान, अजित पवार भाजपच्या मार्गावर असल्याचं बोललं जातं आहे. त्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं मोठं भाष्य केलं आहे.

ब्रेकिंग! राज्य सरकार बरखास्त करा, काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी

सुषमा अंधारे म्हणाल्या, “अजित पवार यांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेलीये. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला मिळणाऱ्या प्रतिसदानंतर भाजपकडून हे केलं जात आहे. फडणवीसांचं मौन सगळंकाही सांगून जात आहे. स्क्रिप्ट रायटर हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असं त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

अजित पवारांच्या बंडखोरीवर शरद पवारांनीच पडदा पाडला! पडद्यामागे केल्या ‘या’ हालचाली…

त्याचबरोबर पुढे त्या म्हणाल्या, “अजित पवार यांनी काल भाजपमध्ये जाणाऱ्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे शिंदे गटाचे लोक उघडे पडले आहेत. महाविकास आघाडी अभेद्य आहे. आम्ही एकत्र निवडणुका लढवणार आहोत. असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सूर आहे.

अजित पवार व संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी! आरोप -प्रत्यारोप झाले सुरू…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *