
मुंबई : सत्ताधारी आणि विरोधीपक्ष यांच्यामधील संघर्ष बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर गेला. ‘५० खोके, एकदम ओके’ अशी विरोधकांनी घोषणा केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर लक्ष्य केंद्रित करत जोरदार घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर देत विरोधकांनीही घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये संघर्ष चांगलाच पेटला. हा संघर्ष शिवीगाळेपर्यंत देखील पोहोचला. दरम्यान या संघर्षावर बोलताना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी आपण बांगड्या घातलेल्या नाहीत असं सांगत इशारा दिलाय.
Mumbai: विलेपार्लेत गोविंदाचा दहीहंडीच्या सातव्या थरावरून पडून मृत्यू, आयोजकाला अटक
अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात (Aditya Thackeray) बॅनरबाजी करत घोषणा देखील दिल्या. त्याचबरोबर ‘युवराजांची दिशा चुकली’ अशी टीकाही करण्यात आली आहे.
Supriya sule: अहो या नवीन सरकारचा हनिमून आणखी किती दिवस टिकणार, सुप्रिया सुळेंचा घणाघात
भरत गोगावले माध्यमांशी बोलताना म्हणाले, “त्यांनी तीन दिवस घोषणाबाजी केली, आम्ही दोनच दिवस घोषणा केली, आम्हाला डिवचू नका, आम्ही काही करणार नाही. पण तुम्ही अंगावर आलात, तर आम्ही हात बांधून बसणार का?. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. बाळासाहेबांनी सांगितलं आहे रडायचं नाही, लढायचं. त्याप्रमाणे आम्ही लढत आहोत,”