सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अश्लिल रॅप साँग संदर्भात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी एक पत्र लिहीत या घटनेची शासनाने दाखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडं केली आहे.
समोश्याबद्दल ‘ही’ माहिती तुम्हाला माहिती आहे का? कधीही न ऐकलेली माहिती वाचून व्हाल थक्क
पाहा नेमकं काय म्हंटल आहे अजित पवारांनी पत्रात?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आणि विद्यापीठ वास्तुचा फार मोठा इतिहास आहे. अशा या विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत, अधिसभा भरते त्या ठिकाणी अश्लील भाषेतील रॅप साँगचे शूटिंग केले गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कुलगुरुंच्या खुर्चीवर बसून समोरच्या टेबलवर दारूची बाटली आणि शस्त्र ठेऊन रॅपरने रॅप साँग चित्रीत केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.
ब्रेकिंग! कांदा अनुदानाच्या अर्जासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
हा सर्व प्रकार अत्यंत निंदनीय असून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नावलौकिकाला काळीमा फासणारा आहे. या संदर्भात चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची तसेच विद्यापीठाने एक चौकशी समितीही नियुक्त केल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, या घटनेची शासन स्तरावरुन सुध्दा दखल घेण्याची आवश्यकता आहे.
संरक्षणमंत्री कोरोना पॉझिटिव्ह; कोरोना रुग्णांची संख्या वाढली
या धक्कादायक प्रकारामुळे राज्यातील जनतेत प्रचंड संतापाची भावना आहे. पोलीस तपास आणि चौकशी समितीचा अहवाल तातडीने प्राप्त करुन घेऊन संबंधित दोषींविरुध्द कारवाई करण्याबाबत शासनस्तरावरुन सुध्दा आदेश देण्यात यावेत. तसेच, भविष्यात असा प्रकार कोणत्याही विद्यापीठात वा शिक्षण संकुलात होणार नाही, यासाठी मार्गदर्शक सूचना शासनामार्फत निर्गमित करण्यात याव्यात, अशी मागणी मी या पत्राव्दारे करीत आहे. असं अजित पवार यांनी म्हंटल आहे.
आराध्यासाठी बच्चन कुटूंबाने घेतली उच्च कोर्टात धाव; खोट्या बातमीमुळे उचलले ठोस पाऊल