पॅनकार्ड हे महत्त्वाचे ओळखपत्र म्हणून ओळखले जाते. ते इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून जारी केले जाते. ITR फाईल करणे असो किंवा बँक अकाउंट असो पॅनकार्ड गरजेचे असतेच. एवढंच नाही तर बऱ्याचदा नोकरीच्या ठिकाणी देखील पॅनकार्ड (Pancard) ची गरज पडते. असे हे महत्त्वाचे कागदपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण, आता चक्क पॅनकार्डवर कर्ज उपलब्ध होणार आहे. (Loan on pan card)
पुण्यात अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले; राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
इथून पुढच्या काळात पॅनकार्ड धारकांना कर्ज हवे असेल तर ते ५० हजार रुपयापर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागणार नाही. एवढंच नाही तर कोणत्याही बँकेमधून हे कर्ज उपलब्ध होऊ शकते. यासाठी जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता.
कर्ज घेताना तुम्ही व्यवसाय कर्ज, गृह कर्ज व वैयक्तिक कर्ज यातील कोणत्याही प्रकारात कर्ज घेऊ शकता. मात्र पॅनकार्ड वरून कर्ज घेताना तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या कामाच्या अनुभवाबद्दल देखील सांगावे लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे पॅनकार्डवर वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी तुमच्याकडे किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असायला हवा.
मोठी बातमी! गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात दोन तास चर्चा; राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण