‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant) होय. राखी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. राखी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकादा राखीला ट्रोल देखील केले जाते. राखी खुप वेळा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकते. राखी तिच्या बिंधास्त वक्तव्यामुळेही नेहमीच चर्चेत येते.
अतिक अहमदच्या हत्येबद्दल समोर आली धक्कादायक माहिती!
राखीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की, राखीचे चाहते तिच्यासोबत सेल्फी घेत आहेत. मात्र, अचानक सेल्फी घेत असलेल्या चाहत्यांचे मोबाईल हिसकावून घेत राखी गाडीमध्ये जाऊन बसते. त्यांनतर मोबाईल देणार नाही असे देखील म्हणते. यांनतर राखी हस्ते आणि चाहत्याचा मोबाईल देत स्वतःच त्याच्यासोबत सेल्फी देखील घेते.
मोठी बातमी! राहुल गांधी यांनी सोडला सरकारी बंगला
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. दरम्यान, काही दिवसांपासून राखी सावंत वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. बिग बॉस मराठी मधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंतने आदिल दुर्गाणी याच्यासोबत विवाह केल्याचे स्पष्ट सांगितले. तसेच विवाहानंतर राखीने इस्लाम धर्म स्वीकारला. मध्यंतरी राखीने आदिलवर काही गंभीर आरोप केले. त्याप्रकरणी आदिल सध्या जेलमध्ये आहे.
गौतमी पाटीलचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; लोक म्हणाले ही तर…