
सध्या बीड जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील महिलेने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी माझ्या मुलाला आमदार करा. तो शेतकरी तसेच गरीब जनतेची कामे करतो मात्र काम करत असताना त्याला पद नसल्याने भरपूर अडचणी देखील येतात. तो फक्त एक रुपया महिन्याने काम करेल असं म्हणत शेतकरी कुटुंबातील महिलेने आपल्याला मुलाला आमदार करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सागरबाई विष्णू गदळे असे या महिलेचे नाव असून त्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दहिफळ (वड) या ठिकाणच्या रहिवाशी आहेत.
अजितदादांना वगळले अन् राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांना दिली संधी; शरद पवारांचा अजित पवार यांना दणका
वाचा जसेच्या तसे पत्र –
मुख्यमंत्री शिंदे साहेब आपणास पत्र लिहीण्याचे कारण – माझ्या श्रीकांतला आमदार करण्याबाबत… मी सागरबाई विष्णू गदळे आपणास विनंती करते की, माझा मुलगा श्रीकांत गेल्या अनेक वर्षापासून राज्याती ल शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर सातत्याने काम करत आहे. मात्र त्याच्याकडे कसलेही पॅड नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपण माझ्या श्रीकांतला आमदार करा, तो १ रूपया प्रतिमहीना मानधनावर काम करणायला तयार आहे माझ्या श्रीकांतला आमदार होऊन राज्यातील शेतकरी, आत्माहत्या मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. एवढेच नाही तर, मघराष्ट्रातील गरीबी हटवण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून गरीबीमुक्त महाराष्ट्र करायचा आहे हे काम माझ्या श्रीकांतला करायचे आहे.
अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
त्यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही माझ्या श्रीकांतला आमदार करा. व राज्यातील शेतकरी, व गोरबरीबांची सेवा करण्याची संधी द्या, जर आपण माझ्या श्रीकांतला ही संधी दिली तर मी आपली खुप आभारी राहील आणि नक्कीच माझा श्रीकांत आपण दिलेल्या आमदारकीचा योग्य वापर करून, राज्यातील जे प्रश्न प्रलंबीत आहेत ते सोडवायचा प्रयत्न करेल.
माझ्या मुलाला आमदार करा तो शेतकऱ्याची गोरगरीबाची खूप कामे करतो मात्र त्याच्याकडे पद नसल्यामुळे त्याला अडचणी येतात… तो एक रुपया महिन्याने काम करेल… शेतकरी आईची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी @mieknathshinde#farmers pic.twitter.com/8f5pgnKMt5
— Tushar More (@TusharM89136638) April 23, 2023
धक्कादायक! लोकांचे मोबाईल हिसकावून गाडीत बसत राखी सावंतने काढला पळ; पाहा Video