
लोक पैसे कमावण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर कष्ट करत असतात. पण काही लोकांचं एका रात्रीत देखील नशीब बदलत. अशा घटना कायम घडत असतात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेममध्ये (Dream XI online game) कराडच्या एका तरुणाने १ कोटी २० लाख रुपये जिंकले आहेत. (A young man from Karad has won 1 crore 20 lakh rupees.)
सागर गणपतराव यादव (Sagar Ganpatrao Yadav) असे या तरुणाचे नाव आहे. त्याला लहानपणापासून क्रिकेटचं वेड असल्याने मागच्या काही वर्षांपासून तो ड्रीम इलेव्हन ही गेम खेळत होता. सध्या IPL चे वारे जोरदार वाहत आहे. सगळीकडे IPL चीच चर्चा सुरु आहे. यामध्ये या तरुणाचे नशीब बदलेले आहे. सागरने निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले असून त्याला चक्क १ कोटी २० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
यामधील टीडीएस कट करून ८४ लाख त्याला मिळाले आहेत. त्यामुळे त्याच्या गावात देखील जल्लोष सुरु आहे. सागर हा शेतकरी घरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्यामुळे त्याचे आईवडील देखील खूप आनंदी झाले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या सभेकडे लोकांनी फिरवली पाठ; निम्म्याच्या वर खुर्च्या रिकाम्याच
मुलाच्या यशाबद्दल बोलताना त्याचे आईवडील म्हणाले, “आम्ही एका शेतकरी कुटुंबातील आहोत आम्हाला एवढे पैसे मिळतील असा स्वप्नातही विचार आला नव्हता मात्र सागने मेहनत घेऊन हे करून दाखविले. आम्हाला या गोष्टीचा खूप आंनद आहे.” अशी प्रतिक्रिया त्याच्या आईवडिलांनी दिली आहे.
मांजर आडवी गेली तर…जाणून घ्या खरे सत्य! माहिती वाचून तुम्हीही व्हाल थक्क