Sharad Pawar: महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही? शरद पवारांच्या त्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात संभ्रम

Sharad Pawar: Mahavikas Aghadi won't fight together? Sharad Pawar's statement created confusion in the political circle

अगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या (Upcoming 2024 Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी (Political parties) दमदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान २०२४ मधील सर्व विधानसभा व लोकसभा निवडणुका (Loksabha Elections 2024) एकत्र लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी यावर संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. निवडणूका एकत्र लढण्याची फक्त इच्छा पुरेशी नसते. असे शरद पवार म्हणाले आहेत.

Tarek Fateh: मोठी बातमी! पाकिस्तानी लेखक तारेक फतेह यांचं दुःखद निधन

शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत सत्ता स्थापन करतील अशी चर्चा रंगली होती. अजित पवारांनी ( Ajit pawar) या चर्चांवर स्पष्टीकरण देऊन देखील या चर्चा थांबल्या नाहीत. दरम्यान शरद पवारांनी अदानी समूहाची पाठराखण केली. यामुळे ते एनडीए मध्ये सहभागी होतील. अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

तुम्हीही सब्जाचे सेवन करता का? तर हे एकदा वाचाच

अशातच अमरावती दौऱ्यामध्ये शरद पवारांनी २०२४ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीची एकत्र काम करण्याची इच्छा आहे. मात्र फक्त इच्छा पुरेशी नसते. अजूनही जागांचे वाटप झालेले नाही. त्यामध्ये अडचणी सुरू आहेत. अजून वाटप झाले नाही तर एकत्र लढण्याबाबत आताच कसं सांगू? असे शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

कराडमधील तरुणाने ड्रीम ११ मध्ये जिंकले १ कोटी २० लाख रुपये; आई वडील भावुक होत म्हणाले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *