राज्यातील शेतकऱ्यांनी बऱ्याचदा दिवसा वीज मिळावी यासाठी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर निर्णय घेत राज्य सरकारने ( State Government) एक नवीन योजना राबवलीआहे. शिंदे- फडणवीस सरकारने नुकताच सौर कृषी वाहिनी २.० राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवसा वीज उपलब्ध करून देणारी ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. ( New Scheme)
Rakhi Sawant: मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राखी सावंत घेणार थेट नरेंद्र मोदींची भेट!
सौर कृषी वाहिनी योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvisयांनी दिले आहेत. नुकतीच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली असून सौर कृषी वाहिनी योजना २.० चे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
Arjun Tendulkar: ‘या’ महिला क्रिकेटरच्या प्रेमात अर्जून तेंडूलकर? दोघांचे प्रायव्हेट फोटोही आले समोर
दरम्यान मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही योजना शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त योजना ठरणार आहे. कारण ही स्वस्त आणि हरित ऊर्जा आहे. असे उद्गार लोकार्पण करताना देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणारा जिल्हा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्नशील अशी सूचना देखील त्यांनी यावेळी दिली.
शेतकरी पुत्राने स्वतःच्या रक्ताने राज्यपालांना लिहिले पत्र! म्हणाला, “मला आमदार करा मी….”