Supriya Sule: सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण! सत्ताधाऱ्यांवर केले गंभीर आरोप…

Supriya Sule: Ajit Pawar's support from Supriya Sule! Serious allegations were made against the rulers...

मागील काही दिवसांत राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार ( Ajit Pawar) यांच्याबाबत अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अजित पवारांनी स्वतः माध्यमांशी संवाद साधून या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तरीदेखील या चर्चा सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची बहीण व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी गंभीर आरोप करत आपल्या भावाची पाठराखण केली आहे. (Supriya Sule takes stand for Ajit Pawar)

वजन आणि रंगामुळे अर्पिता ट्रोल होताच पती आयुष शर्मा भडकला; म्हणाला, “ती नेहमीच लोकांच्या…”

महाराष्ट्र भूषण सोहळ्यादरम्यानची घटना अतिशय दुर्दैवी होती. सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे ही घटना घडली. ही बातमी दाबायची होती. म्हणून, राष्ट्रवादीची बदनामी केली गेली. रोजच पक्षाबद्दल गॉसिप का सुरू आहे? हम लढेंगे और जितेंगे भी ! पण या पत्रकारांचे सोर्स नक्की आहेत तरी कोण? ते आपल्या पक्षातील आहेत की, दुसऱ्या पक्षातील? असा प्रश्न यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

खुशखबर! शेतकऱ्यांना स्वस्तात दिवसा वीज मिळणार; राज्य सरकारने राबवली नवीन योजना

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळें यांनी मुंबई फिल्म सिटी ( Mumbai Film City) बद्दल देखील वक्तव्य केले आहे. मुंबई फिल्म सिटी करोडो लोकांना रोजगार देत आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी फिल्म सिटी हलवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही शुटिंग कुठेही करा, परंतु या राज्यातून फिल्म सिटी हलवून देणार नाही. ते फक्त ग्लॅमर नाही तर यामुळे लोकांच्या हाताला काम मिळते. जिथे संघर्ष करायची गरज आहे, तिथे आम्ही संघर्ष करणार असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत.

Rakhi Sawant: मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राखी सावंत घेणार थेट नरेंद्र मोदींची भेट!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *