रोहित शर्मा ( Rohit Sharma) हा टीम इंडियाचा दमदार खेळाडू आहे. सध्या तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा आयपीएल मधील आघाडीचा संघ म्हणून ओळखला जातो. या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत अनेकदा यश मिळवले आहे. दरम्यान माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर ( Sunil Gavaskar) यांनी रोहित शर्मासाठी एक मोठा सल्ला दिला आहे.
वजन आणि रंगामुळे अर्पिता ट्रोल होताच पती आयुष शर्मा भडकला; म्हणाला, “ती नेहमीच लोकांच्या…”
रोहित शर्माने सध्या आयपीएलमधून काही काळासाठी विश्रांती घ्यावी आणि शेवटच्या काही सामन्यांमध्ये ताजेतवाने होऊन परतावे. असे सुनील गावसकर म्हणाले आहेत. मुंबई इंडियन्स व गुजरातचा संघ यांच्यात नुकताच एक सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला अतिशय वाईट पद्धतीने पराभव स्वीकारावा लागला.
Supriya Sule: सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण! सत्ताधाऱ्यांवर केले गंभीर आरोप…
यानंतर बोलताना सुनील गावसकर यांनी रोहित शर्माला सल्ला दिला. तसेच मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीत आता काही बदल अपेक्षित आहेत. असेही ते यावेळी म्हणाले. रोहित शर्माने सध्या काही काळासाठी विश्रांती घेऊन कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी स्वतःला तंदरूस्त ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
खुशखबर! शेतकऱ्यांना स्वस्तात दिवसा वीज मिळणार; राज्य सरकारने राबवली नवीन योजना
रोहित शर्माने शेवटच्या काही सामन्यांमध्ये कमबॅक केले तरी हरकत नाही. परंतु सध्या त्याला विश्रांतीची गरज आहे. असे रोखठोक विधान सुनील गावसकर यांनी केले आहे. मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या पहिल्या चार संघात स्थान मिळवायचे असेल तर त्यांना फलंदाजीसह गोलंदाजी मध्ये सुध्दा असामान्य कामगिरी करावी लागणार आहे. असं देखील सुनील गावसकर यांचे म्हणणे आहे.
Rakhi Sawant: मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राखी सावंत घेणार थेट नरेंद्र मोदींची भेट!