राज्यात राजकीय घडामोडी अतिशय वेगात घडत आहेत. खारघरची घटना, अजित पवारांविषयीच्या अफवा आणि आता बारसू रिफायनरीचा वाद ! ( Barsu Rifinary) यामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. अशातच काल (ता.२६) शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत ( Uday Samant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांची भेट घेतली. एवढंच नाही तर यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी शरद पवार यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. अशी माहिती समोर आली आहे. (Eknath Shinde Called Sharad Pawar for discussion)
Rohit Sharma : रोहित शर्माने आयपीएलमधून ब्रेक घ्यावा! ‘या’ माजी दिग्गज फलंदाजाचा सल्ला
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निमित्ताने त्यांनी ही भेट घेतली. यावेळी शरद पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बारसू ग्रीन रिफायनरी बाबत चर्चा झाली. या दोन्ही नेत्याच्या कोणती इतर राजकीय चर्चा झाली असेल का ? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
Supriya Sule: सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण! सत्ताधाऱ्यांवर केले गंभीर आरोप…
भेटीनंतर माध्यमांसोबत बोलताना शरद पवार म्हणाले की, भेटीदरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दोन गोष्टी सांगितल्या. बारसू येथे आंदोलनावेळी पोलीस बळाचा वापर करण्यात आला होता. तसेच लोकांना समजून सांगितल्यावर तिथे फारसा विरोध नाही. महत्त्वाची बाब म्हणजे बारसू बाबत काही घाईने निर्णय घेऊ नका. असा सल्ला शरद पवारांनी उदय सामंत यांना दिला आहे.
वजन आणि रंगामुळे अर्पिता ट्रोल होताच पती आयुष शर्मा भडकला; म्हणाला, “ती नेहमीच लोकांच्या…”