अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) हे कायम या न त्या कारणाने चर्चेत असतात. दरम्यान नुकताच एका लेखिकेने त्यांच्यावर लैंगिक शोषण ( Sexual Haraasment) केल्याचा आरोप केला आहे. याआधी एडल्ट स्टारने त्यांच्यावर असा आरोप केला होता. या दोन्ही आरोपांमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. ऐन निवडणूक तोंडावर आली असता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गंभीर आरोप त्यांना अडचणीचे ठरू शकतात.
Rohit Sharma : रोहित शर्माने आयपीएलमधून ब्रेक घ्यावा! ‘या’ माजी दिग्गज फलंदाजाचा सल्ला
पुढच्या वर्षी अमेरिकेत ( America) राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. यासाठी माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार तयारी सुरू केली असून ते पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या तयारीत आहेत. परंतु अशातच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने सर्वत्र चर्चांना उत आला आहे. माजी स्तंभलेखिका ई जीन कॅरोल ( E Jin Carol) यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हे आरोप केले आहेत.
Supriya Sule: सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण! सत्ताधाऱ्यांवर केले गंभीर आरोप…
डोनाल्ड ट्रम्प यांनी १९९६ मध्ये न्यूयॉर्कमधील डिपार्टमेंटल स्टोअरच्या चेंजिंग रूममध्ये कॅरोल यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. असे कॅरोल यांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांनी माझ्यावर बलात्कार केला. मात्र यावर मी जेव्हा लिहिले तेव्हा, त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी खोटे बोलून माझी प्रतिष्ठा खराब केली. असे कॅरोल यांनी म्हंटले आहे.
शरद पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा; राजकीय घडामोडींना वेग