
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटीच्या वाटेवर आहे. अशी शक्यता मागील काही दिवसांत व्यक्त केली जात आहे. इतकंच नाही तर अजित पवार (Ajit Pawar) भाजपच्या वाटेवर आहेत अशा अफवा देखील राजकीय वर्तुळात पसरल्या आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धक्कादायक घडामोड घडली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे.
Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकचे ब्रेक फेल, 12 वाहनांची धडक; ६ जण जखमी
याठिकाणी माजी गृहमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींनीच बंड केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह सर्वांसमोर उघडा पडला आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) यांच्या अतिशय जवळचे नेते देवदत्त निकम ( Devdatta Nikam) यांनी स्वतंत्र पॅनल स्थापन केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळी वाढली आहे. खरंतर देवदत्त निकम हे आंबेगाव तालुका आणि शिरूर लोकसभेतील मोठे नेते आहेत. यापुर्वी ते भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन होते.
Gautami Patil: गौतमी पाटीलबद्दल ‘ही’ गोष्ट एकूण बसेल धक्का!
तसेच त्यांनी खासदारकीची निवडणूक सुद्धा लढवली आहे. एवढंच नाही तर मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. परंतु सध्या त्यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या आदेशाविरोधात बंड केले आहे. यामुळे देवदत्त निकम यांना पक्षातून काढून टाकण्याच्या जलद हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळी कशी दूर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अन् महिलेने गाडीवरून मारली उडी! रॅपिडो ड्रायव्हरने महिलेसोबत केले गैरवर्तन