
जिओ (Jio) ही देशातील आघाडीच्या मोबाईल नेटवर्क कंपन्यांपैकी एक आहे. स्वस्तात मस्त प्लॅन्स व फास्ट नेटवर्क हीच या कंपनीची ओळख आहे. मोबाईल नेटवर्क कंपन्यांमध्ये सध्या जिओ आणि एअरटेल ( Airtel) मध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. दरम्यान या स्पर्धेत आघाडी मिळवण्यासाठी एअरटेलने एक अतिशय स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. (New Recharge Plan ) यामुळे जिओची डोकेदुखी वाढली आहे. हा प्लॅन जिओपेक्षा स्वस्त असल्याने एअरटेल कडे ग्राहकांचा ओढा वाढण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे हा प्लॅन एअरटेलचा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन (BroadBand Plan) आहे. या प्लॅनबाबत एअरटेलने कोणतीच आगाऊ माहिती दिली न्हवती. शांतीत क्रांती करत एअरटेलने हा प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन आता एअरटेल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. हा नवीन प्लॅन एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरच्या पोर्टफोलियाचा भाग असणार आहे.
Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकचे ब्रेक फेल, 12 वाहनांची धडक; ६ जण जखमी
एक्सस्ट्रीम फायबर लाइट ( Extreme Fiber Lite) असे एअरटेलच्या नवीन प्लॅनचे नाव आहे. या प्लॅनसाठी ग्राहकांना महिन्याकाठी २१९ रुपये मोजावे लागतील. यामध्ये फ्री राउटर आणि फिक्स्ड स्पीड इंटरनेट सुविधा असणार आहे. हे तुम्ही वर्षभराच्या सब्सक्रिप्शनवर विकत घेऊ शकता. यात युजरला 10 एमबीपीएसचा डेटा स्पीड मिळेल. विशेष म्हणजे हा प्लॅन फ्री राउटरसह आहे. हा प्लॅन फक्त बिहार, उत्तर प्रदेश पूर्व आणि आंध्र प्रदेशसाठी लाँच करण्यात आला आहे.